प्रतिनिधी -महेश गायकवाड
अडावद -कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रुखनखेडा प्र.अडावद येथे ध्वजारोहण संपन्न
रूखनखेडा चे जेष्ठ नागरिक डाॅ.दिलीप नरहर अडावदकर यांना ध्वजारोहण चा मान देण्यात आला.सुरूवातीला भारतमाता पुजन, राष्ट्रगीत,ध्वजारोहण, ध्वजगीत,देशभक्तीपर गीत, सादर करण्यात आले.तसेच जि.प.शाळेच्या परिसर हा रांगोळी,फुलांनी सजावट करण्यात आली.
विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सुरूवातीला अडावद येथील औषध विक्रेते राहुल अडावदकर, रोहित अडावदकर यांनी मास्क, सॅनीटाईजर,तसेच लहान मुलांना बिस्किट, चॉकलेट वाटप करून त्यांना कोरोना नियम पाळणेस सांगितले.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली.यावेळी गावातील ग्रा.पं.सदस्य व देशभक्त आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. मंगेश सुरेश कडू सर,उपशिक्षक श्री.कैलास भगवान पवार सर यांनी केले.ध्वजारोहण नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा हि रूखनखेडा वासीयांची पूर्वीपासून चालत येत आहे.या प्रसंगी सरपंच श्री. प्रकाश साळुंखे,उपसरपंच सौ.पुष्पाबाई मनोज अडावदकर, ग्रा.पं.सदस्य जुबेदाबाई तडवी, छन्नु भिल,शरद कोळी, संतोष सोनवणे, पो.पाटील डाॅ. रामचंद्र सोनवणे,शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे, शालेय शिक्षण समिती अध्यक्षा सौ. रेखाबाई रामचंद्र सोनवणे, व अंगणवाडी सेविका छायाबाई राजपूत आदी उपस्थित होते.












