जळगाव – जिल्हयात जबरीने मोबाईल फोन चोरून नेण्याचे प्रमाण वाढल्याने गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणे बाबत मा. पोलीस अधीक्षक सो डॉ. श्री प्रविण मुंडे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री चंद्रकात गवळी यांनी केलेल्या मागदर्शन व सुचना नुसार मा. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली एंरंडोल पोस्टे सीसीटीएनएस गुरनं ५४/२०२२ भा.द.वि कलम ३९२ सदरचा गुन्हा हा जळगाव शहरातील गेंदालाल मील भागत राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहंमद अनिस उर्फ मुसा पिंजारी याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली त्यानुसार, पोहेकॉ/, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, पोना/ प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, पोकॉ/सचीन चौधरी, चापोकाँ/ प्रमोद ठाकुर सर्व नेमणुक स्था.गु.शा, यांना आदेश दिल्याने सदर पथकाने संशयीत असलेला आरोपी मोहंमंद अनिस उर्फ मुसा मोहंमंद युसुफ पिंजारी वय २८ रा. गेंदालाल मील जळगांव हा गेंदालाल मील रिक्षा स्टॉप भागात त्याचे दोन साथीदारांसह रिक्षात बसलेला असतांना मिळुन आल्याने त्यास व त्याचे साथीदारासह वर नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सांगीतले सदरचा गुन्हा मी सुमारे ०१ महीन्यापुर्वी पारोळा एरंडोल हायवे वरून रात्रीच्या वेळेस एका इसमांकडुन माझे दोन मित्र नामे मनोज विजय अहीरे वय ३० रा. गेंदालाल मील जळगाव, व दुसरा मित्र रिक्षा चालक नामे रहेमान रमजान पटेल वय – ३७ रा. लक्ष्मी नगर गेंदालाल मील जळगांव यांचे मदतीने जबरीने चोरी केला होता. अशी कबुली देत गुन्हयात चोरलेला ओपो A 31 कंपनीचा मोबाईल काढुन दिला. तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा ही आता तुमच्या समक्ष असलेली रिक्षा तिच असल्याचे सांगीतल्याने आरोपी नामे – १) मोहंमंद अनिस उर्फ मुसा मोहंमंद युसुफ पिंजारी वय २८ रा.गेंदालाल मील जळगांव, २) मनोज विजय अहीरे वय-३० रा. गेंदालाल मील जळगाव, ३) रहेमान रमजान पटेल वय ३७ रा. लक्ष्मी नगर गेंदालाल मील जळगांव यांस गुन्हया कामी ताब्यात घेतले असुन व जबरीने चोरून आणलेला ओपो A 31 कंपनीचा मोबाईल व गुन्हा करते वेळी वापरलेली रिक्षा क्रं MH-15 FU 0075 गुन्हयाकामी जप्त करून आरोपीतांना पुढील कारवाई कामी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.