पारोळ्यातील माजी नगरसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

0
43

जळगाव – येथील माजी नगरसेवक महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) यांना शुक्रवारी (ता. २०) सकाळी अज्ञात वाहनाने मागून दिलेल्या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी महेश चौधरी आपल्या खासगी कामासाठी एरंडोल प्रांत कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते.

सार्वे गावाजवळील जिओ पेट्रोलपंपाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास पारोळ्याकडून एरंडोलकडे जात असताना पाठीमागून वाहनाने त्यांच्या बुलेटला (क्रमांक एमएच १९, सीएच १३११) जोरदार धडक दिली.

या धडकेत महेश चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील लोकांनी एरंडोल रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत पारोळा पोलिसात अंकित महेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास सहाय्यक फौजदार इक्बाल शेख करीत आहेत.

महेश चौधरी हे तेली समाजाचे माजी अध्यक्ष होते. या घटनेमुळे पारोळा शहरात शोककळा पसरली होती. रात्री नऊला अमळनेर रोडजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love