मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

0
12

चोपडा – सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्याची घटना शहरापासून तीस किमीवरील सातपुड्यातील मेलाणे गावात उघडकीस आली असून हि कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुणही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेलाणे गावात सव्वा एकर शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दुपारी शेतात धाड टाकून त्यात त्यांना मक्याच्या सव्वा एकर क्षेत्रात गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले. गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली. रात्री दहा वाजता गांजा भरलेला ट्रक चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासकरण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई

चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील , पोलिस निरीक्षक कावेरी कमालकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे युनूस शेख, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने गांजा जप्त केला.

Spread the love