चाळीसगावात बनावट आयुवैदीक औषध विक्रीचा गोरखधंदा ?

0
43

जळगाव -येथे गेल्या काही दिवसांपूर्वीच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणार्‍या बनावट इंजेक्शन विक्री करणार्‍या एका मेडिकल चालकांवर गुन्हां दाखल झाल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा शहरात आयुवैदिक जडी-बुटींच्या नावाखाली बनावट आयुवैदिक औषध विक्रीचा गोरखधंदा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील गायत्री कॉम्प्लेक्स येथे एका आयुवैदिक दुकानाच्या माध्यमातून तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंबंधी चौकशीसाठी आज पोलिसांचे पथक येवून गेले, परंतू दुकान मालकसह त्याचे साथीदार पोलीस येण्याआधिच तीन दिवसांंपासून बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना आल्यापायी परत जावे लागले.

जडी-बुटीच्या माध्यामातून उपचारानावाखाली रुग्णाचे विवस्त्र फोटो काढून वैदू सूरजसिंग राजूसिंग चितोडिया(रा.भूसावळ) याने एका ४० वर्षीय रुग्णाकडून उपचारासाठी शक्तीवर्धक औषधींच्या नावाखालीस चाळीसगाव येथील गायत्री कॉम्प्लेक्समधील चामुंडा आयुवैदिक व धुळ्यातील साईनाथ औषधी केद्रातून सुमारे दोन ते तीन लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला सूरजविरुद्ध खंडणी व बेकायदा वैद्यकिय उपचार केल्याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या चौकशीत चाळीसगाव येथील चामुंडा आयुवैदिक केंद्राच्या माध्यामातून देखील तरुणाची फसवणूक झाल्याचे उघड झाल आहे. त्यामुळे भडगाव पोलिसांचे पथक आज(दि,२१ डिसेंबर २०२१) चौकशीसाठी येथील गायत्री कॉम्प्लेक्सस्थित चामुंडा आयुवैदिक केंद्रातू येवून गेले, परंतू हे दुकान बंद असल्याने त्यानी आजु-बाजूच्या गाळाधारकाकडे चौकशी करुन ते परतले. चामंडु आयुवैदिक केंद्र हे गेल्या वर्षभरापूर्वीच गायत्री कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरु झाले आहे.

गेल्या वर्षभरात अनेक संशायास्पद लोक येथे औषध घेण्यासाठी येतांना दिसून येत असल्याची चर्चा आहे. विशेषता: सेक्स संबंधीत शक्तीवर्धक औषध विक्रीचा मोठा गोरधंदा इथे गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याची चर्चा आहे. आयुवैदिक औषधांमध्ये ‘ ऍलोपॅथी ’ औषधांच्या गोळ्या मिक्स करुन, त्यांची बारीक भुकटी आयुवैदिक औषध म्हणून महागड्या दराने तोळ्यात विक्री करत असल्याची देखील बोलले जात आहे. तरी देखील स्थानिक पोलिसांना याचा सुगावा लागला नाही, हे विशेष म्हणता येईल.

आपल्या साथीदारावर गुन्हां दाखल झाल्याची माहिती मिळताच येथील चामुंडा आयुवैदिकचे मालक हे दुकान बंद करुन बेपत्ता झाले आहेत. आता पोलीस त्यांच्या मागावर असून कुठल्याही क्षणी त्यांना ताब्यात घेवू शकते.

कसून चौकशीची गरज-

चाळीसगावात रेमडीसीवर नतंर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणार्‍या बनावट इंजेक्शन विक्री, आणि आता आयुवैदियक बनावट औषधांचा विक्रीचा गोरखधंदा सुरु असल्याची चर्चोे आहे. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या अशा भोंदूचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातील आयुवैदिक औषधे विक्री करणार्‍यांची चौकशी करुन, ते बनावट तर विक्री करत नाही, यांची खातर जमा करणे गरजेचे आहे.

Spread the love