कामावरुन घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला! अपघातात चोपड्याचे तिघं ठार, चार गंभीर

0
26

जळगाव -: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहीवद फाट्याजवळ ओमनी आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 3 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाला असून यात दोन दुचाकी ओमनीला धडकल्याने ही जीवितहानी झाली.

या अपघातातील चार गंभीर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबात पोलिसांकडू मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील अमळनेर तालुक्यातील दहीवदजवळ हा अपघात झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात दोन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकींनी ओमनी टॅक्सीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकी चक्काचूर होत रस्त्याच्याकडेला फेकल्या गेल्या. यात चोपडा येथील तीन तरुणांचा मृत्यू तर ओमनी चालकासह चार जण जखमी झाले आहेत.

कामावरुन घरी परतताना काळाचा घाला

शुभम ओंकार पारधी, विजय बाळू पाटील आणि केवाराम पावरा असे अपघातात मयतांची नवे असून सर्वजण चोपडा येथील रहिवाशी होते. दरम्यान, शनिवारी शुभम ओंकार पारधी, विजय बाळू पाटील, केवाराम पावरा यांच्यासह चोपडा येथील सहाजण अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे केटरर्सच्या कामासाठी दुचाकीवर गेले होते. काम आटोपून रात्री दोन दुचाकीवरून सर्वजण चोपड्याकडे निघाले असता दहीवदजवळ समोरून येणाऱ्या ओमनीला या दोन्ही दुचाकींनी धडक दिली. यात तिघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे

.

Spread the love