सुनसगाव येथील शेतकऱ्याची रस्त्याच्या ठेकेदारा कडून फसवणूक ?

0
17

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील गोजोरा रस्त्याला लागून असलेल्या शेतात माती टाकून भराव करण्याचे आश्वासीत करुन डांबर मिश्रीत माती टाकल्याने हंगाम गेल्याने अन्यायग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे.

या बाबत माहिती अशी की सुनसगाव येथील प्रभाकर सोपान पाटील यांची गावाला लागून तसेच गोजोरा – सुनसगाव रस्त्यावर गट नंबर ४७ /१ शेती आहे. या शेतात गोजोरा – सुनसगाव रस्त्यावर काम सुरु असताना या शेतात रस्त्यावर निघणारी काळी माती टाकून भराव करुन देणार असल्याचे संबंधीत ठेकेदाराच्या कर्मचारी यांनी सांगितले होते. मात्र मुरुम मिश्रीत व डांबर मिश्रीत माती टाकून आज रोजी शेतात या मातीचे ढीग आहेत तर काळी माती टाकण्यात आलेली नाही.तसेच मातीचे ढीग पसरविण्यात आलेले नसून आता रस्त्याचे काम पुर्ण होण्याच्या मार्गावर असून नशिराबाद भागात काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चालू वर्षातील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम हातातून गेले आहेत. वारंवार विनंती करुनही शेतात माती टाकण्यात आलेली नाही .तरी संबंधीत ठेकेदाराने लवकरात लवकर शेतात भराव टाकावा अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी प्रभाकर सोपान पाटील यांनी केली आहे.

Spread the love