चोपड्यात बीआरएसतर्फे मोफत डोळ्यांचे महाशिबिर संपन्न..

0
40

चोपडा – तालुक्यातील गरीब गरजू नेत्ररुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्याभरातून आलेले सुमारे २५० पेक्षाही जास्त नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ नेत्ररुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. ह्या नेत्ररुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आनंद (गुजरात) येथील डोळ्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहे. याआधीच्या शिबीरात सुमारे ३६० पैकी ७० नेत्ररूग्णांची मोफत मोतीबिंदु शस्रक्रिया करण्यात आली होती. त्या रूग्णांना ह्या शिबीरात अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आलेत. नेत्रतपासणी डॉ. प्रकाश कोळी (धुळे) व त्याचे सहकारी यांनी केली.

यासाठी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या संकल्पनेतून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येत असुन तालुक्यातील गरीब गरजु नेत्ररूग्णांनी अशा शिबीराचा लाभ घेतला पाहिजे. यापुढिल शिबीरासाठीची नाव नोंदणी बापुजी कॉम्प्लेक्स् येथील बीआरएसचे कार्यालय व श्री एकविरा कृषी सेवा केंद्र या ठिकाणी सुरू आहे. यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या जिल्हा महिला समन्वयक सौ. कोमल पाटिल, विधानसभा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुकाप्रमुख दिपकराव पाटिल, महिला कार्यकर्त्या पमाताई पानपाटिल, वर्षा पाटिल, युवाध्यक्ष अनिल कोळी, वैभवराज बाविस्कर हे विशेष परिश्रम घेत आहे.

Spread the love