हेमकांत गायकवाड
चोपडा: श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे जिल्हा व राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे दरवर्षी वितरण करण्यात येते .सन 2021 चा जिल्हास्तरीय संताजी कृषी सेवा रत्न पुरस्कार चोपडा येथील श्री फुलचंद शंकर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे संस्थेचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी श्री फुलचंद शंकर चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ फुलचंद चौधरी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .संस्थेतर्फे दिला जाणारा या पुरस्काराचे वितरण डिसेंबर महिन्यात एका सन्मान सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे के .डी .चौधरी यांनी या वेळी सांगितले .फुलचंद चौधरी यांनी कृषी क्षेत्रात विशेष योगदान देऊन दरवर्षी विशेष उत्पन्न घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले . फुलचंद चौधरी यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त नंदू गोविंदा चौधरी, देवकांत के .चौधरी, गोपीचंद रघुनाथ चौधरी ,नारायण पंडित चौधरी तसेच प्रकाश श्रावण चौधरी, चंद्रशेखर मधुकर चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .पुरस्कार झाल्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष टी .एम. चौधरी, विश्वस्त संजय कौतिक चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.