गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, ३ जणांचा मृत्यू; प्रशासनाचे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन

0
40

उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले.

या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये 4 स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून शोध मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी गौरीकुंड धरण पुलियाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली 20 जण दबले गेले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 17 जणांना शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या पथकासह शोध मोहिमेत गुंतले आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे.

Spread the love