गावठाण जागा मालकी हक्क व सनद वाटप मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
11

जळगाव –  प्रजासत्ताक द‍िन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महास्वाम‍ित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव ज‍िल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या या मोहीमेत जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून यातून ३ लाख ९५ हजार रूपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड व शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परेड मैदानावर सनद वाटप करण्यात आले. त्यानंतर ज‍िल्हा अधीक्षक भूमीअभ‍िलेख कार्यालयाने ज‍िल्ह्यात २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी सनद वाटप मोहीम मोठ्या प्रमाणात राबव‍िली. स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या जळगाव जिल्हयातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून ३ लाख ९५ हजार २८८ रूपयांची सनद फी वसुल करण्यात आलेली आहे.

रावेर तालुक्यातील मौजे पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगांव खु, चोरवड, कोळोदे, मांगी या १० गावात ३२९ सनद वाटप करण्यात आल्या असून १ लाख ५२ हजार ४३३ रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

जळगाव तालुक्यातील मौजे देवगाव, मोहाडी, खेडी खु, पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु, या ८ गावात २४८ सनद वाटप करण्यात आल्या असून ९७ हजार ८० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहेत.

पारोळा तालुक्यातील मौजे सोके, हिरापुर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे, या १० गावात २२६ सनद वाटप करण्यात आल्या असून ८७ हजार २६० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

यावल तालुक्यातील मौजे पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव या ८ गावात ११२ सनद वाटप करण्यात आल्या असून एकुण ४३ हजार ५७० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

पाचोरा तालुक्यातील मौजे हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु, या ४ गावात ३५ सनद वाटप करण्यात आल्या असून १४ हजार ९४५ रूपये सनद फि वसूल करण्यात आलेल्या आहेत.

स्वाम‍ित्व योजनेत जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्यात येणार आहेत. गावातील मालमत्तांचे जी. आय. एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहेत. ड्रोन व्दारे गावठाण भूमापन योजना पुर्ण झालेनतंर प्रथम टप्यात विशेष स्वरूपात मोहीम घेऊन सनद वाटप व सनद वसूली करून नागरिकांना सनद वाटपाचा कार्यक्रम ज‍िल्ह्यात राबव‍िण्यात येत असल्याची माह‍िती भूमी अभ‍िलेख व‍िभागाचे ज‍िल्हा अधीक्षक एम.पी.मगर यांनी द‍िली आहे.

Spread the love