जळगाव – : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी मा.पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाण वाढल्या बाबत सुचना दिल्या सदर विषयाबाबत गुन्हेगारांचा शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यावरुन मा.पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स फौजदार अशोक महाजन, पोह जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे. याचे पथक नेमण्यात आले होते.
मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून जळगाव शहरातील कालिंका माता मंदिरासमोरील १०० फुटी रोड असलेले ओंकार हॉटेलचे बाहेर रोडवर आरोपी पराग राजेंद्र पाटील, वय २१, रा. तेली चौक साई बाबा मंदिर जवळ शनिपेठ जळगाव यास गावठी वरील पिस्तोला सह पथकाने ताब्यात घेवून त्याचे कडून १ गावठी बनावटीची पिस्तोल जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.