गावाकडे परतताना एकुलत्या एक मुलाला हिरावले; रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू, आईचा आक्रोश

0
27

जळगाव : कामानिमित्त नाशिकला असलेल्या आईला घेऊन मुलगा गावाकडे निघाला होता. मात्र गावी येण्यापूर्वीच आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जळगाव ते भुसावळ दरम्यान रेल्वेतून पडल्याने घरातील कमावत्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आई आणि दोन बहिणींचा आधार गेला आहे.

सदर घटना ६ जूनला जळगाव तालुक्यातील तरसोदजवळच्या रेल्वेरूळाजवळ घडली.

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील आनंद अशोक रजाने (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. आई व दोन बहिणीसह तो वास्तव्यास होता. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. आनंदची आई सखुबाई नाशिक येथे उदरनिर्वाहासाठी गेल्या होत्या. मात्र, नाशिकला नको, आपल्या गावाकडेच काम करू, असे म्हणून आनंद याने आईला घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६ जूनला दुपारी गीतांजली एक्स्प्रेसने दोघेजण नाशिकहून भुसावळ जाण्यासाठी निघाले.

Spread the love