गिरीश भाऊ ,वागणे बरे नव्हे!  शिवराम पाटील     

0
11

जळगाव-: जिल्ह्यातील जामनेर चे आमदार मा.गिरीश महाजन शिंदे सरकार मधे ग्रामविकासमंत्री झाले.आम्हाला आनंद झाला.आमचे गिरीश भाऊ आता झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवतील.अशी आमची आशा होती.म्हणून प्रत्यक्ष भेट घेऊन कैफियत मांडली.जळगांव जिल्ह्यातील ग्रामविकास खाते भ्रष्टाचारात अव्वल आहे. जिल्ह्यातील तक्रारदार आणि ग्रामविकास खात्याचे चोर अधिकारी आमनेसामने बसून तक्रारींचा निपटारा करावा.दोषींवर तेथेच ,त्याच क्षणी कारवाई करावी.

अशीच तक्रार माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांचेकडे केली होती.त्यांचा सत्तेचा रथ जमीनीपासून चार अंगुळे वर चालत होता.हे कोण?आमच्या कमाईच्या आड येत आहेत. टाका यांना जेलमध्ये.नंतर त्यांचा सत्ते चा रथ भोसरी च्या चिखलात रूतला.ते खाली उतरले.तेंव्हा बाणवर्षाव चालू ठेवला.म्हणाले ,माझा रथ रूतला आहे.थांबा.बाण मारू नका.कोणीच थांबले नाहीत.म्हणाले ,योद्धा रथावरून खाली उतरला आहे. तर त्याचेवर शरसंधान करू नये.हे धर्माच्या विरोधात आहे.तेंव्हा, खडसेंना उत्तर मिळाले,राधासुता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?

आता आमचे ग्रामविकासमंत्री मा.गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले कि,साहेब, ग्रामविकास खात्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, चालू आहे.त्याची जबाबदारी तुमची आहे.किमान जळगाव जिल्ह्यातील तरी हप्तेबाजी बंद करा.डाकिणसुद्धा एक घर सोडून देते.तसा तुम्ही जळगाव जिल्हा तरी सोडा.हे तुमचे होमग्राऊंड आहे.किमान जिल्ह्यातील तक्रारी आमनेसामने बसून निपटारा करा.सीईओ ,बीडीओ घाऊक प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत.याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरतो.

गिरीश महाजन यांनी हो तर म्हटले पण अजून त्यांनी तशी तयारी दाखवली नाही.कदाचित आम्ही जिल्ह्यातील मतदारांचे शोषण होणे त्यांना खटकत नसावे.कदाचित जिल्ह्यातील , जामनेर मधील मतदारांची त्यांना कधीच गरज पडणार नाही.त्यांना गरज आहे,झेडपी नोकरांची.त्यांचेच मतांनी गिरीश महाजन पुन्हा आमदार बनतील,असा त्यांना विश्वास आहे.म्हणून नाशीक येथील सम्मेलनाचे उद्घाटन गिरीश महाजन करणार आहेत.त्यांना आशिर्वाद देणार आहेत.त्यांना संदेश देणार आहेत.त्यांना अभय देणार आहेत.तुम्ही लुटमार चालू ठेवा.मी तुमच्या पाठीशी आहे.येऊन जाऊन तक्रार माझ्याकडे येईल.कारवाई करणे अथवा न करणे माझ्या हाती आहे.

या कृतीबद्दल आम्ही गिरीश महाजन यांना दोषी ठरवत आहोत.तसा आमचा वैधानिक अधिकार आहे.आम्ही जिल्ह्यातील नागरिकांनी , मतदारांनी गिरीश महाजन यांना आमदार निवडून दिले.आणि तेच मतदारांच्या, नागरिकांच्या विरोधात जात आहेत.असे आजचे वास्तव आहे.गिरीश भाऊ,सत्ता येते जाते.संपत्ती येते जाते.पण मतदारांची अवहेलना केली, प्रतारणा केली तर खडसेंसारखी दैना होऊ शकते.म्हणून म्हणतो,हे वागणे बरे नव्हे!

शिवराम पाटील                                  ९२७०९६३१२२                                              महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Spread the love