गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंनी फोडला नवा बॉम्ब

0
40

जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघांकडूनही सातत्याने एकमेकांवर कुठले न् कुठले आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

अमित शहा यांनी स्वत:गिरीश महाजन यांना याबाबत विचारणा केली होती. त्यावर महाजन यांनी सांगितले की, माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोलणे सुरु असते. पण शहांनी त्यांना सांगितले की, तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहे. त्यावर रात्री एक वाजेनंतरही तुमचे कॉल झालेले दिसत आहेत. दिवसभरात शंभर-शंभर वेळा कॉल झालेले आहेत. सीडीआर खरं बोलत आहे. त्या महिलेशी तुमचा काय संबंध? असे थेट अमित शहा यांनी महाजन यांना सुनावल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या क्लीपचा हवाला देत केला.

एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या अमित शहांसोबत भेटीगाठी होत असतात. मी त्यांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे. मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे मागचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी फोडलेल्या या नव्या बॉम्बमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर महाजन विरुद्ध खडसे ही लढाई अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गिरीश महाजन काही स्पष्टीकरण देता का तेही बघावे लागणार आहे.

Spread the love