हेमकांत गायकवाड
चोपडा : श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाज मंगल कार्यालय संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे जागतिक फोटोग्राफर दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात फोटोग्राफर यांचा गौरव करण्यात आला. या यावेळी महाराष्ट्र असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य श्री ए. पी. पाटील सर ,श्री राहुल राजेंद्र पाटील, श्री प्रशांत सुभाष चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर यांचे शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नेरकर आप्पा ह .भ. प. देवरे महाराज, प्रकाश चौधरी, जितेंद्र चौधरी, दिलीप बडगुजर, श्रीमती कलाबाई सुभाष चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री गोपाल प्रकाश चौधरी यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला व सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.