प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – गोंभी येथे सालाबादा प्रमाणे व स्व.जगन्नाथ भगत जळगाव खुर्द यांच्या आशिर्वादाने यंदाही आज २० रोजी श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून बारागाड्या विजय कोळी हे ओढणार असून त्यांना जितेंद्र कोळी व राजेंद्र कोळी(JSN) हे बगले म्हणून सहकार्य करणार आहेत. तसेच रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सोमनाथ नगरदेवळेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेत मिठाई, खेळणी, पाळणे व इतर अनेक दुकाने येतात.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन व कुऱ्हा दुरक्षेत्राचे चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील सौ. वैशाली प्रमोद पाटील व सरपंच सौ.काजल भोजराज कोळी ,ग्रामपंचायत सदस्य सौ.रंजना सुधाकर पाटील व गावातील तरुण यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणार आहेत.