प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ –गोदावरी इंग्लिश मेडीयम स्कूल जळगाव येथे पर्यावरण पूरक माती पासून तयार केलेली गणपती मूर्ती स्थापन करण्यात आली होती. ८×४ फुट आकाराच्या स्टेजवर जवळपास ३० कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे पेपर ,पुठ्ठा ,नारळदोरी , सूती दोरी अशा पासून वडाच्या झाडाची निर्मिती करुन याच ठिकाणी गणपती स्तोत्र , मंत्र व इतर माहितीची मांडणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे कमी वेळेत कलाशिक्षक सुधीर सुकलाल पाटील यांनी ही कामगीरी पार पाडली.या अगोदर शाळूमाती पासून मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण सुधीर पाटील सरांनी विद्यार्थ्यांना दिले होते. प्रसंगी प्राचार्या निलिमा चौधरी ,दत्तात्रय शेळके सर,आश्विनी मँडम व सर्व वर्गशिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.