प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि.१९ मार्च रोजी श्री मरी माता यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमीत्ताने संध्याकाळी ६ वाजता बारागाड्या भगत आत्माराम दोडे उर्फ दोडे बाबा हे ओढणार असून त्यांना घनश्याम कोळी ,संतोष पाटील ,जिवन जावळे ,शांताराम दोडे ,लक्ष्मण सपकाळे ,नारायण दोडे हे सहकार्य करणार आहेत.भगत दोडे बाबा हे दरवर्षी बारागाड्या ओढतात विशेष म्हणजे आजतागायत येथील बारागाड्यांना गालबोट लागलेले नाही. दि.१८ रोजी गावातील देवतांना आमंत्रण देण्यात येणार असून ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी रात्री लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे . यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोनि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पोऊनि संजय कंखरे तसेच पोलीस कर्मचारी हेमंत मिटकरी , योगेश पालवे , नखुले ,पारधी ,पोलीस पाटील विनोद सपकाळे, तंटामुक्ती अध्यक्ष कोळी तसेच होमगार्ड हे चोख बंदोबस्त ठेवणार असून परिसरातील जनतेने यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व यात्रा समितीच्या सदस्यांनी केले आहे.