भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी यांची निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांचे पती माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांनी स्वखर्चातून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावाचा सुनसगाव रस्ता, चोरवड रस्ता, वराडसिम रस्ता, कुऱ्हा पानाचे रस्ता सर्व साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे स्मशानभूमीचा परिसर ही अतिशय स्वच्छ करण्यात आला आहे. गावात गटारी मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते परंतु आता गटारी ही साफ करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे लक्ष्मण कोळी हे स्वता थांबून कामे करून घेत आहेत. गावातील जास्तीत जास्त तरुणी व तरुणांनी सैन्य दलात भरती व्हावे ,पोलीसात भरती व्हावे यासाठी गावातील स्मशानभूमीला लागून असलेल्या मैदानावर ट्रॅक तयार करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे.
गावाला लागूनच रस्त्यावर लावलेल्या झाडांना चूना आणि गेरु लावण्यात आल्याने गावाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. विशेष म्हणजे गावात सुरू असलेली विकास कामे पाहून गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. गोजोरे गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे बोलले जात असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी यांनी सांगितले आहे.