गोजोरे विकासोचे जिल्हा बॅंकेला साकडे ?

0
29

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील काही विविध कार्यकारी सोसायटी संस्था अवसायनात गेल्याने या ठिकाणी असलेले संचालक मंडळ राहणार की जाणार ? असे वाटत असतानाच गोजोरे विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व संचालक मंडळाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सन २०२३ – २४ या वर्षाची वाटप विकास सोसायटी मार्फत करण्यात यावी अशी मागणी गोजोरे विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व संचालक मंडळाने निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की , गोजोरे विविध कार्यकारी सोसायटी ला वांजोळा , गोजोरा ,मिरगव्हाण व भुसावळ अशी गावे जोडली आहेत. जर सोसायटी मार्फत कर्ज वाटप करण्यात आले नाही तर या शेतकऱ्यांना भटकंती करावी लागणार आहे त्यामुळे गोजोरे विविध कार्यकारी सोसायटी च्या शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत कर्ज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Spread the love