ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर!! महानिर्मिती मार्फत भुसावळ येथे बंपर भरती जाहीर

0
49

भुसावळ – तुम्ही जर ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. भुसावळ अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 200 जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर 2023 पर्यंत आहे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी / Apprentice

भरतीसाठी पात्रता : अर्ज करणारा उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2023

वयोमर्यादा : 20 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.

शुल्क : शुल्क नाही

पगार – 6,000/- रुपये ते 6,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

Spread the love