तरुणांसाठी खुशखबर! इथे मिळेल सरकारी नोकरीची संधी .. ‘शिपाई’ पदांच्या 125 जागांवर भरती, पगार 47600 

0
43

तुम्हीही जर राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या 23 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. या भरतीद्वारे एकूण 125 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव : शिपाई (गट-ड) / Peon (Group – D)
आवश्यक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असावा

किती पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये पर्यंतचा पगार मिळेल. अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते मिळतील.

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 900/- रुपये]

Spread the love