चोपडा (प्रतिनिधी)तालुक्यात दि.९ जून रोजी रात्री काही भागात वादळीवारा विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला.त्यात गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील गोरगावले बुद्रुक, वडगावसीम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगाव, गोरगावले खुर्द, वडगाव खुर्द, खेडी, भोकरी, सनपुले, घुमावल बुद्रुक ह्या शिवारातील प्राथमिक नुकसानीच्या अहवालानुसार अंदाजे ६८७ शेतकऱ्यांचे एकूण ४७१ हेक्टरवरील केळी बागांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परंतु प्रत्यक्ष परिस्थितीनुसार नुकसान क्षेत्र व शेतकरी संख्येत वाढ होऊ शकते.अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंके यानी दिली आहे.
https://youtu.be/tnKNN38hRdE
याप्रसंगी कृषी सहाय्यक कैलास देशपांडे, तलाठी व्हि.पी.पाटील, पोलीसपाटिल विनोद पाटिल, विकासो.चेअरमन सदानंद पाटिल, कोतवाल चंद्रकांत सरदार यांचेसह नुकसानग्रस्तं शेतकरी यांचीही उपस्थिती होती.कटाईवर आलेल्या केळी बागांचे अस्मानी सुल्तानी संकटांमुळे खूपच नुकसान झालेले आहे.याबाबत शासनाने रितसर पंचनामा करून तातडीने मदत जाहिर करावी,अशी मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.