गोरगावले रस्त्यावरील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी.. नवीन रस्ता खचल्यामुळे अपघाताची शक्यता.. जगन्नाथ बाविस्कर 

0
48

हेमकांत गायकवाड

चोपडा: तालुक्यातील गोरगावले बुद्रुक,खेडीभोकरी पर्यंतचा रस्ता नवीन बनविण्यात येत असून काही ठिकाणी रस्त्याला संरक्षण म्हणून भिंती मंजूर आहेत.त्यापैकी एका ठिकाणची भिंत अपूर्णच असल्याने तेथील मातीमुरुम खडीरेतीचा भराव पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने नवीन रस्त्यावर लांबचलांब भेगा पडून त्या ठिकाणी रस्ता भूकंप सदृश्य खचून गेलेला आहे. या ठिकाणी लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून गोरगावले रस्त्यावरील अपूर्ण संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर(गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील वर्षापासून या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे.काही ठिकाणी रस्त्याला संरक्षण म्हणून अपुर्ण भिंती बांधण्यात आलेल्या आहेत. पुढील ठिकाणच्या संरक्षण भिंती अजूनही बांधलेल्या नाहीत. याबाबत मागील वर्षी सा.बां.चे अधिकारी प्रमोद सुशीर यांनी या अपूर्ण संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणीही केली होती. त्यावेळेस गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर, पोलीसपाटील विनोद पाटील, कृषी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे ही उपस्थित होते.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे श्री.सुशीर यांनी सांगितले होते.पण ठेकेदार यांनी अपूर्ण संरक्षण भिंतीच्या ठिकाणी मातीमुरुम खडीरेतीचा भराव करून रस्ता बनविलेला आहे. सध्याच्या पावसामुळे तेथील भराव वाहून गेल्याने नवीन अर्ध्या रस्त्यातच मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत.येथे सध्या मातीचा भराव करण्यात येत आहे.परंतु पुढिल पावसाच्या पाण्यामुळे हा भराव वाहुन अपघात होण्याचा धोका आहेच.म्हणुन ह्या अपूर्ण संरक्षण भिंतीचे काम संबंधित विभाग व ठेकेदार यांनी त्वरित पूर्ण करावे,अशीही आग्रही मागणी गोरगांवले बु.पंचक्रोशितील ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love