चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुकचा रस्ता नवीन बनवण्यात आला असून यावल हायवेवरून गोरगावले फाट्याजवळ आदर्शनगरकडे उतरतांनाचा रस्ता खराबच राहिलेला आहे.त्यापुढील नवीन रस्त्याची रुंदी ३० फुटांची असून राहिलेल्या रस्त्याची रुंदी फक्त १२ ते १५ फूटच आहे.ह्या खराब रस्त्यावरून वापरतांना कॉलनी परिसरातील नागरिकांना व लहान वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून तेवढे अंतर पार करावे लागते.याठिकाणी दिवसभरातुन बर्याच वेळेस वाहनांची कोंडी होते.याचा पादचारी व वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो.तसेच रस्त्याच्या एका बाजूला तारेचे कुंपण व दुसऱ्या बाजूला खोल रस्ता असल्यामुळे याठिकाणी मोठ्या वाहनांचा अपघातही होऊ शकतो.हा रस्ता बनवितांना उत्तरेकडील बाजूस मोठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी,अशी मागणी चोपडा न.प.हद्दीतील कॉलनावासियांतर्फे होत आहे.
विशेष असे की,गोरगावले खेडीभोकरी पर्यंतचा रस्ता नविन व मजबूत बनविलेला असून गोरगांवले फाट्यावरील फक्त पाचशे फुटांचा रस्ता कच्चा व खराब राहिलेला आहे.म्हणून गोरगावले रस्त्याचा हत्ती गेला अन् शेपूट राहिले,असेच म्हणावे लागेल.संबंधित विभागातर्फे राहिलेला खराब रस्ता त्वरित बनविण्यात यावा,ह्याच रस्त्यावरिल हतनूर कालव्यावरील पुलांची रुंदी वाढवुन अपूर्ण राहिलेल्या संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.