शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, दरमाह मिळतील ३ हजार रुपये; कसा कराल अर्ज?

0
48

देशात नागरिकांसाठी अनेक नवीन योजना राबवल्या जातात. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ‘पीएम किसान मानधन योजना’.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला काही पैसे मिळणार आहे. ही योजना 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी आहे. अर्जदाराच्या वयानुसार गुंतवणुकीची किंमत ठरवली जाते. पीएम किसान मानधन योजनेत तुम्ही 18 व्या वर्षी अर्ज करु शकता. 18 व्या वर्षी तुम्हाला 55 रुपये प्रत्येक महिना गुंतवावे लागेल. तसेच 40व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दर महिना 200 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

Spread the love