जळगाव – : ग्रामीण मतदारसंघात धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदा, असोदा, जळगाव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील गावे या मतदारसंघात असल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांचे येथे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. सन 2009 मध्ये गुलाबराव देवकर याच मतदारसंघातून विजयी होत राज्यमंत्री देखील झाले होते. मात्र गुलाबराव देवकरांची या मतदारसंघावरील पकड ढिली झाल्याने गुलाबराव पाटील यांना मतदारांनी संधी दिली. सुरुवातीला गुलाबराव पाटील राज्यमंत्री झाले तर आता शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्विकारत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख असली तरी ती गुलाबराव पाटील यांच्यामुळे राहिली आहे. काही जुने शिवसैनिक आजही उद्धव सेनेसोबत कायम असून ते राष्ट्रवादी (शप)ला साथ देतील. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांना राजकीय समीकरणासाठी कदाचित उबाठाची ‘मशाल’ हाती घ्यावी लागले. उमेदवार तोच मात्र चिन्हं बदल असे समीकरण येथे होवू शकते. शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, निलेश चौधरी व भाजपाचे कार्यकर्ते चंद्रशेखर अत्तरदे हेही नशिब आजमाविण्याची शक्यता नाकरता येत नाही.