“हा रेडा विधानसभेसाठी तयार आहे, गुलाबराव पाटलांचं राऊतांना थेट आव्हान

0
59

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) शिंदेंचा रस्ता पकडला.

त्यामुळे सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्याकडे मतदारसंघात उमेदवार शोधण्याचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यातच आता महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला मिळणार आहे. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यांच्या उमेदवार असेल तर त्यांचं नाव जाहीर करावं, असे थेट आव्हानच गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) दिलं आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा पाच वेळा आमदार देणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढणारच आहे. परंतु ज्यावेळी संजय राऊतांनी सांगितलं होतं की, ४० रेड्यांचं आम्ही वध करणार आहोत. मग या ४० रेड्यापैकी या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे. आता तुझ्या माणसाला तलवार घेऊन माझा वध करण्यासाठी पाठव. अंधाऱ्या बाई देखील याठिकाणी येऊन गेल्या आहेत. मग त्यांनीही आपला उमेदवार जाहीर करावा. असे आव्हानच गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) दिलं आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला. त्याच्यामध्ये आम्ही देखील होतो. बाळासाहेबांचे विचार काही लोकांनी सोडले असतील, परंतु आम्ही अजूनही सोडलेले नाही. त्यांच्या विचारनेच आम्ही या मतदारसंघात काम करतोय. त्याच्यामुळेच जनता आमच्या पाठीशी उभी आहे. आता ज्या मतदारसंघात संघटन बांधलं आहे. त्याच मतदारसंघात उमेदवारी घेण्याकरीता ठाकरे गटाकडे इतकी उदासिनता का आहे ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, सर्वात जास्त आमदार देणारा आमदार म्हणजे जळगाव ग्रामीण. मग हा मतदारसंघ घेण्याकरीता इतकी उदासिनता का ? ए फ्लसची जागा आहे मग का घेत नाहीत. ते संजय राऊत आता कुठे अडकले आहेत ? माझी ताकद ही माझे कार्यकर्तेच आहेत. जनतेला देव मानतो. माझ्या ताकदीला जनतेचे आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळेच मी आतापर्यंत उभे आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याच पद्धतीने यंदाचा विजश्री खेचून आणतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Spread the love