स्वाभिमानाच्या बाता मारत वर्षभरापूर्वी शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आता जशा निवडणूक जवळ येऊ लागल्या आहेत तसे तिकीटासाठी लाचार होताना दिसत आहेत.
सोमवारी गोरेगाव येथे मिंधे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात चक्क राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाया पडताना दिसले. त्यांच्या या लाचारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनीही मिंध्यांच्या या लाचारीला ट्रोल केले आहे.
https://fb.watch/lhlj6m1WtJ/?mibextid=YCRy0i