ज्ञानवापी प्रकरण! हिंदू पक्षाला मिळाला तळघरात पूजेचा अधिकार

0
43

ज्ञानवापी प्रकरणात बुधवारी वाराणसी न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ज्ञानवापी संकुलात असलेल्या ‘व्यास का तैखाना’ येथे तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला मिळाला. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला.

हिंदू पक्षकाराने पूजाअर्चा करण्याची मागणी केली होती. काशी विश्वनाथ ट्रस्टच्या अंतर्गत ही पूजा केली जाणार आहे. या निकालानंतर हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, व्यासाचे तळघर येथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने सात दिवसांच्या आत तिथे व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून तिथे प्रत्येकाला पूजा करण्याची संधी मिळेल. यानिर्णयानंतर हिंदू पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

 

Spread the love