एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोष उर्फ “बब्या” ची एमपीडीए अंतर्गत औरंगाबाद कारागृहात रवानगी

0
47

जळगाव – दारूबंदी कलमांसह अन्य एकुण नऊ गुन्हे दाखल असलेल्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश काढले असून त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शनिवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) (२४, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध दारुबंदी कलमांसह अन्य एकूण नऊ गुन्हे दाखल आहे. तसेच दोन वेळा प्रतिबंधात्मक करावाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पोकॉ साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून एमपीडीए कायद्यांर्गत औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

Spread the love