हरणाची शिकार करून मांस शिजवले : एकाला अटक

0
17

यावल – तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वन जंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणची शिकार करण्यात येवुन तिचा मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात आहे.

या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील काळाडोह या ठीकाणी भेकर या प्रजातीची शिकार करून मांस शिवजवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच व वनक्षेत्राचे पथकासह मौजे काळाडोह पाड्यावर जाऊन संशयीत आरोपी इसम नामे हवलदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडले. तसेच त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले.

या प्रकरणी वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र. रि. क्रमांक०३ / २०२४ दिनांक ३एप्रील रोजी नोंदवून आरोपीस दिनांक ४ एप्रिल रोजी न्यायाधीश यावल यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वनकोठडी सुनावली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यावल, यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरच्या कार्यवाही मध्ये यावल पूर्व वनक्षेत्रातील कर्मचारी राजेन्द्र तायडे, बी. बी. गायकवाड यांच्यासह पुर्व विभागाचे व पश्चीम क्षेत्राचे कर्मचारी आणी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सहभागी होते.

Spread the love