चोपडा – तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. तापी नदीवर मुख्यत्वे उकाई धरण, काकरापार धरण, व हतनूर धरण बांधण्यात आलेले आहे.त्यापैकी हतनुर धरणातून तापी नदीत आमच्या हक्काचे व हिश्याचे पाणी आवर्तन सोडण्यात यावे,अशी मागणी चोपडा तालुकावासियांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे.कारण पावसाळा संपला की तापीत पाण्याचा प्रवाह खंडीत होऊन नदीचे पात्र कोरडेठाक होत असते.धरणाच्या वरिल भागात मुबलक पाणी असल्याने तो भाग सुजलाम सुफलाम होतो.व धरणाखालील भागात पाणी वाहत नसल्याने टंचाई निर्माण होत असते.यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेलेली आहेच. केळी,ऊस,पपई व इतर भाजीपाल्यांचे पिकांना पाणी अपूर्ण पडत आहे.तसेच बागायती कापूस व इतर पिके लागवड करतांना सुद्धा पाण्याची गरज भासत आहे.म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन मिळाले पाहिजे.अशीही अपेक्षा तापी नदि काठावरिल ग्रामस्थांतुन केली जात आहे.
श्रेय कुणीही घ्या पण तापीसह जनतेची तहान भागवा.
उन्हाळ्यात पाणी टंचाई भासु लागताच अनेर व गुळ धरणातुन पाण्याचे आवर्तनासाठी संबंधित विभागाला निवेदने दिले जातात.त्याची लगेच पुर्तता होते.तसेच प्रयत्न हतनुर मधुन तापीत पाणी सोडण्यासाठी झाले पाहिजेत.दरवर्षी जानेवारी मार्च व मे महिन्यात पाण्याचे आवर्तन दिले पाहिजे.गरज नसतांना नदि भरून पाणी वाया जाणेसाठी सोडण्यात येते.याचे श्रेय कुणीही घ्या,पण तापी नदीसह जनतेची तहान भागवा.हि आमची आर्त हाक आहे.
जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमेटी चोपडा.
…………………………………………….