अल्लू अर्जुनचा जेलमधील मुक्काम वाढणार का? सायंकाळी होणार सुनावणी

0
17

पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी आज (13 डिसेंबर) पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी तात्काळ अल्लूला न्यायालयात हजर केले. न्यायमूर्ती जुववादी श्रीदेवी यांच्यासमोर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुन मार्फत दाखल केलेल्या रद्दबातल याचिकेवर लंचनंतर सुनावणी घेण्याची विनंती केली.

या याचिकेत अल्लूविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सुनावणीदरम्यान विनंती केली की, पोलिसांना सोमवारपर्यंत अल्लूला अटक करण्यापासून रोखणारा आदेश जारी करावा. अल्लूच्या वकिलांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ते पोलिसांशी चर्चा करतील आणि दुपारी 4.00 पर्यंत उत्तर देतील.

न्यायमूर्ती श्रीदेवी यांनी या प्रकरणावरील सुनावणी 4.00 वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. अल्लूला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी अल्लूविरुद्ध कलम 105, कलम 118(1), बीएनएस कायद्याच्या 3/5 या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यातील कलम 105 हे अजामीनपात्र गुन्ह्याचे आहे.

Spread the love