‘हेच’ पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो. जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

0
14

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तापी नदिवरील हतनुर धरणातुन दरवर्षी जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाण्याचे एकेक आवर्तन सोडण्यात यावे,अशी आर्त मागणी तापी नदि काठावरिल गावचे ग्रामस्थं व शेतकर्यांमधुन होत असते.परंतु संबंधित विभाग ह्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असतात.साधारणत: नोव्हेंबर डिसेंबर मध्येच तापीचे पात्र कोरडे होण्यास सुरूवात होत असते.तापीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहुन जमिनीतील पाण्याची पातळी टिकुन राहिल.यासाठी जानेवारी मध्ये पहिले,मार्च मध्ये दुसरे व मे मध्ये तिसरे पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे.जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हाच पाणी दिले पाहिजे.नंतर वाहुन वाया जाण्यासाठी पाणी सोडण्यात येते.धरणाच्या वरिल भागात पाऊस होत असल्याने धरणाला धोका होऊ नये म्हणुन आता अवास्तव पाणी सोडण्यात येत आहे.हेच पाणी आम्ही ‘मे’ महिन्यात टंचाई काळात मागत होतो.याबाबत संबंधित विभागाने दखल घेतली पाहिजे,अशी स्पष्टोक्ती चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

Spread the love