अरे माणूस आहेस का भूत”, दिलीप प्रभावळकरांना बाळासाहेब ठाकरे असं का म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

0
15

चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणून दिलीप प्रभावळकरला ओळखले जाते. नुकतंच मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण सांगितली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे हसवाफसवी हे नाटक प्रचंड गाजले. या नाटकाचे अनेक प्रयोग हाऊसफुल ठरले होते. यासोबतच दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगादरम्यानची एक खास आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे दिलीप प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दीड तासांचा हा प्रयोग त्यांनी फार जास्त रंगवला होता. त्यावेळी “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?” असे बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, असा किस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला.

दरम्यान दिलीप प्रभावळकर यांनी दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला आहे. विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून त्यांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत.

Spread the love