मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक कथित फोन कॉल सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यामध्ये मराठा कार्यकर्ता नारायण राणे यांना फोन करतो. सुरूवातीला हा फोन नारायण राणे यांच्याशी संबधित असलेला व्यक्ती उचलतो. नंतर हा व्यक्ती नारायण राणे यांना फोन देतो. यावेळी मराठा कार्यकर्ता आणि नारायण राणे यांच्यात थोडा संवाद झाल्यानंतर नारायण राणे संबंधित मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचे ऐकायला मिळते.
फोन करणारा मराठा कार्यकर्ता आपली ओळख रविंद्र मुटे अशी सांगतो आणि आपण छत्रपती संभाजीनगर मधून फोन केल्याचे सांगत असताना वारंवार जय शिवराय असा उल्लेख करतो. दरम्यान, राणे आणि मराठा कार्यकर्त्याच्या संवादाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ही शिवीगाळ आहे. पण या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही.