प्रविण मेघे
यावल – तालुक्यातील डोंगर कठरा येथील जितेंद्र रविंद्र सरोदे यांची नुकतीच हिंदवी स्वराज्य सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची नियुक्ती छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले तसेच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश लंगर व उपाध्यक्ष खगेश देसले यांच्या पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे,त्यांनी जिल्हाध्यक्ष असतांना संघटनेचा अधिक विस्तार करुन दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पडल्यामुळे त्यांच्यावर प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.