हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता राज्यात 700 ठिकाणी

0
48

राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे 210 कोटी 1 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या असे 155 दवाखाने आहेत. त्यात आतापर्यंत 7 लाख 43 हजार 570 रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. येणाऱया पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी आणखी 210 कोटींची तरतूद करण्यात येईल. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱया निधीचीदेखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेमध्ये हे दवाखाने नागरिकांसाठी खुले असतील. 30 प्रकारच्या चाचण्या या दवाखान्यांमध्ये करण्यात येतील.

Spread the love