हिटरचा शॉक लागून अकारा वर्षीय बालकाचा मृत्यू

0
28

जळगाव संदेश

ममुराबाद : पाणी तापवण्याच्या हीटरचा शॉक लागल्याने ममुराबाद येथील 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.17) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली घटनेबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रणव मुकुंदा पाटील वय 11 राहाणार ममुराबाद ता जि जळगाव हा सकाळी अघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असता त्या ठिकाणी पाणी तापवण्यासाठी हिटर लावलेले होते. त्याने बाथरूम च्या दरवाज्याची कडी आतमधुन लावली होती. अंघोळीसाठी तापलेले पाणी घेण्यासाठी हिटरला हात लावता बरोबर त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यु झाला. काही वेळा नंतर प्रणव बाथरूम मधुन बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बाथरूम मध्ये डोकावुन पाहिले असता प्रणव मृत अवस्थेत दिसुन आल्याने बाथरूमचा दरवाजा तोडुन त्याला बाहेर काढण्यात आले. व तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याला मयत घोषीत केले. या घटनेबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love