भुसावळ – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दि. ७ मार्च रोजी पोलीस उपविभागीय कार्यालयात भुसावळ पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी विभागात काम करणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनचे महिला पोलीस व महिला पोलीस पाटील यांचा सत्कार केला.
भुसावळ पोलीस विभागातील भुसावळ शहर , बाजार पेठ , शहर वाहतूक नियंत्रण शाखा , भुसावळ तालुका व नशिराबाद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस पाटील यांचा प्रमाणपत्र , रोपटे , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत एक कौतुकास्पद उपक्रम पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले साहेब यांनी राबविल्याने पोलीस कर्मचारी पोलीस पाटील महिलांना डोळ्यातील आनंदाश्रू लपविता आले नाहीत. विशेष म्हणजे भुसावळ उपविभागीय कार्यालय व तालुका पोलीस स्टेशनचे सफाई कर्मचारी महिलेचा सुध्दा सन्मान या ठिकाणी करण्यात आला . यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , भुसावळ शहर चे पोलीस निरीक्षक उध्दव डहाळे , बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ , भुसावळ शहर वाहतूक चे महाले साहेब , नशिराबाद पोलीस स्टेशनचे चे योगीता नारखेडे उपस्थित होते.










