आला उन्हाळा, स्वतःला सांभाळा जळगाव शहराचे तापमान वाढले

0
42

उन्हाळा सुरु झाला आहे. दुपारच्या वेळात उन्हात फिरल्यावर उन्हाची झळ चांगलीच जाणवायला लागली आहे. घराघरांमधून पंखे गरगरायला लागले आहेत. फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या सरकल्या आहेत. अशावेळी सूर्याच्या किरणांनी त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वचा, डोळे आणि केस यांची काळजी पुढचे काही महिने घ्यायला हवी. सुर्याची अतिनिल किरण पृथ्वीवर पडल्यास काय होऊ शकते?

माणसांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. लवकर थकायला होतं.

त्वचेच्या कर्करोगाची व इतर त्वचाविकारांची शक्यता वाढते.

डोळ्यांच्या विकारात झपाट्याने वाढ होते. यासाठी उन्हातून आल्यावर थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजेत. रात्री किंवा जेव्हा शक्य आहे तेव्हा डोळ्यांवर कापसाच्या घड्या किंवा काकडीच्या फोडी ठेवल्या पाहिजेत.

नवजात बालके व वयोवृध्द यांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यामुळे घरातल्या लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्या. ते भरपूर पाणी पीत आहेत ना याकडे लक्ष ठेवा.

भरपूर पाणी पिण्याबरोबर ORS चा वापरही केला पाहिजे. भरपूर ताज्या भाज्या आणि उन्हाळी फळं खाल्ली पाहिजेत.

बाहेर जाताना डोकं झाकण्याबरोबर सनस्क्रीन लोशनचा वापर आवश्यक आहे.

डोळे चुरचुरू लागले तर डोळ्यांवर ओल्या कापसाच्या पट्ट्या किंवा काकडीच्या चकत्या ठेवाव्यात. जेणेकरुन डोळ्यांमधले उष्णता शोषली जाते आणि थंडावा मिळतो.

लिंबू, कोकम सरबत, पन्हं भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे. ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास होतो त्यांच्या सेवनात तुळशीच्या बिया असायला हव्यात. आणि या व्यतिरिक्त,

आणि पर्यावरण रक्षण करा. आपल्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. उन्हाचा त्रास सगळ्यांना होतो त्यामुळे ओझोनचा थर कमी होईल असे काहीच आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच ग्रामस्वच्छता, जंगलतोड रोखणं, पाण्याचा सुयोग्य वापर आणि प्रदुषण कमी करण्याासाठीचे विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

आपले कार्बन फूटप्रिंट्स कमी होतील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

Spread the love