जळगाव -: जिल्ह्यातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी, उद्या २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता एकलव्य क्रीडा संकुल येथे मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे.
यासाठी प्रशासन सज्ज झालं असून, जिल्हयातील ११ विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या किती फेऱ्या होणार आहेत याबाबतदेखील मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला निकाल उद्या २३ तारखेला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या ४८ तासात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीला असणार आहे.
विशेष म्हणजे सत्तेची गणितं पुन्हा एकदा अपक्षांच्या हाती गेली, तर मात्र पुन्हा ऑफिस पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासाठी बैठकांमधून रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी, उद्या २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता एकलव्य क्रीडा संकुल येथे मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे.
मतमोजणीसाठी मतदार संघ निहाय फेरी
जळगाव शहर १९ , जळगाव ग्रामीण २९, चोपडा २५, रावेर २४, भुसावळ २३, अमळनेर २४, एरंडोल २२, चाळीसगाव २५, पाचोरा २६, जामनेर २५ आणि मुक्ताईनगर मतदार संघात २३ फेऱ्या मतमोजणी होणार आहेत.