प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथील वांजोळा रोड नजिक व राजस्थान मार्बल जवळ असलेल्या दिनेश टेन्ट हाऊस च्या गोडाऊन ला दि.२७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भिषण आग लागल्याने लाखों रुपये किंमतीचे टेन्ट चे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. या ठिकाणी अनेक समाजसेवकांनी, नागरीकांनी तसेच भुसावळ व दिपनगर येथून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. शाँकसर्किट मुळे आग लागल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.