फुलगाव: भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने आज रोजी २०/१२/२५ येथे पुष्पलता नगर, फुलगावला
राष्ट्रीय संत गाडगे महाराज व माता भिमाई यांच्या पुण्यस्मुती च्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा च्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांच्या हस्ते प्रतिमाना पुष्प अर्पण करण्यात आली.
त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग प्रकाश सरदार यांनी अंधश्रद्धेवर गाडगे महाराजांनी कसा प्रहार करून जनसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व किती आवश्यक आहे.बद्दल मार्गदर्शन केले.प्रमुख उपस्थिती नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमचे जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, मेजर रमेश साळवे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे
हे होते तर कार्यक्रमाला पुष्पलता नगर वाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीसाठी स्वाती इंगळे, वर्षा सोनवणे, साधना इंगळे, विमल इंगळे, ज्योती इंगळे,शोभा इंगळे, माया तायडे, शोभा निकम, गंगुबाई तायडे, सुनीता जोहर, संगीता निकम यांनी परिश्रम घेतले.












