मी एकटाच लांचखोर नाही.

0
14

जळगाव-: मनपात बांधकाम परवानगी साठी कोणी जोशी नावाच्या बिल्डरकडून सीटी इंजिनिअर ने अडीच लाखाची लांच घेतल्याची मोघम तक्रार मोघम नगरसेवकाने केली.फक्त तक्रार केली.पुढे काहीच नाही.ज्या इंजिनिअर ने लांच मागितली,लांच घेतली,त्याला काही नांव गांव आहे कि नाही? कि ते भूत होते कि चुरड होते? जर बिल्डर कडून लांच मागितली तर अण्टीकरप्शन कडून ट्रैप का केले नाही?जर काका नगरसेवक होते तर लांच देण्याआधी तक्रार का केली नाही?असे सर्वच प्रकरण संशयास्पद आहे. सिधे रस्तेकी टेढी चाल है,गोलमाल है भाई सब गोलमाल है.

संबंधित इंजिनिअर शी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि,असे लांच घेणे आमच्यावर बंधनकारक असते.महापौर, आयुक्त, उपमहापौर ही परंपरा नवीन आलो तेंव्हाच समजावून सांगतात.लांच कोणाच्या हस्ते घ्यावी,याचे एक्स्पर्ट एजंट नेमलेले आहेत.लांच मिळाल्यानंतर कोणाला किती वाटणी करावी,याचे रेडी रेक्नर तयार आहे.आम्ही राज्य स्तरावरील कैडरचे अधिकारी जळगाव ला येतो.येथे संगनमताने लांच घेतली जाते.याची माहिती आधीच दिली जाते.त्यातील हिस्सा नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव यांचे पर्यंत कसा पाठवावा,याची संपूर्ण यंत्रणा तयार असते.येथील सर्वच नगरसेवक, सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा सहकार्य करतात.कोणी तक्रार केली तर आम्ही निस्तरायला पाठीशी राहूच,असे अभिवचन दिले जाते.सुरूवातीला आम्ही लांच मागतांना लाज वाटते.शरम वाटते.थोढे आढेवेढे घेतो. पण एक दोन वेळा प्रयोग केल्यावर सवय जडते.अंगवळणी पडते.एकदा का कुंटणखान्यात भरती केले तर दोन चार गिऱ्हाईक घेतांना थोढी वेदना होते.अंग दुखते. नंतर मग,सर्वच एझी होते.काही गडबड घोटाळा झाला कि मौसी सांभाळून घेते.आम्हाला गिऱ्हाईक कडून मिळालेली खुशाली किंवा मेहनताना आमचा एकटीचा नसतो.तो आधी मौसीकडे जमा होतो.मौसी त्याची वाटणी करते.त्यामुळे पुढील प्रकरण हाताळण्याची जबाबदारी मौसीची असते.

जळगाव मनपाचे अभियंता भोसले यांना कामावर रूजू करून घेण्यासाठी आयुक्त सोनवणे, उपायुक्त फातले , महापौर यांनी फिल्डींग लावली.भोसलेंकडून एक लाख घेण्याचा सौदा सोनवणेनी केला.पण पैसे घेण्याचे काम उपायुक्त फातलेंकडे सोपवले.भोसलेंनी अण्टीकरप्शन ची मदत घेऊन उपायुक्त फातले यांना ट्रैप केले.फातले पकडले गेले,जेलमधे जाऊन आले.बाहेर येताच सोनवणेंनी फातलेंना पुर्ववत कारभार सोपवला.फातले निलंबित असूनही मनपात रुबाबाने काम करीत असत.फाईली हाताळत असत.तेव्हा एकाही नगरसेवकाने आक्षेप घेतला नाही.कि ,हा लांचखोर निलंबित उपायुक्त येथे कसा?नगरसेवकच नालायक,लांचखोर असतील तर आक्षेप का घेतील?त्या लांचखोर नगरसेवकांचा शिरोमणी म्हणजे महापौर. आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने आक्षेप घेतला.फातलेंना हाकलून कैबीन सील केले.याचा राग आयुक्त व महापौरांनी लोकशाही दिनी आमचेवर खोटा आरोप करून फिर्याद नोंदवून काढला.असे चोर,कामचोर,लांचखोर आयुक्त, उपायुक्त , अभियंता हे महापौर व नगरसेवकांच्या सहमतीशिवाय इतके धाडस करणे शक्य नाही.तेच धाडस सांप्रत प्रकरणात सीटी इंजिनिअर ने केले आहे.म्हणे,मी एकटाच लांचखोर नाही.

जळगाव मनपा रहस्यमय संस्था आहे.येथे प्रत्येक कर्मचाऱ्याला लाचखोरीचे प्रशिक्षण दिले जाते.जो कोणी आयुक्त किंवा उपायुक्त किंवा अभियंता येतो त्याला आधीच फर्मावले जाते कि तुम्हाला यातून इतके लोणी काढायचे आहे.ते लोणी किती लोकांनी कसे वाटून घेऊ,याचे रेडी रेक्नर बनवलेले आहे.येथे कोणतेही काम फुकट होत नाही.बांधकाम परवानगी असो कि, अतिक्रमण असो कि पाणीपुरवठा असो कि स्वच्छता असो.त्या त्या खात्यातून तितके लोणी काढणे आवश्यक असते.या कामात सर्वच नगरसेवक पाठीराखे असतात.फक्त गडबड कुठे होते?या लाचखोरीतून जास्त लोणी निघाले तर काही मांजरी जास्त डल्ला मारतात.तेंव्हा इतर बोके गुर्र गुर्र करतात.हा गुर्र गुर्र चा आवाज चुकून बाहेर ऐकू आला कि, आमच्या आयुक्तांना,महापौरांना डोकेदुखी होते.तितकेच.गुर्र गुर्र करणाऱ्या बोक्याला थोढे जास्त लोणी दिले कि,तो पुन्हा म्याऊं म्याऊं करू लागतो.

आता हे जोशी नामक बिल्डरचे प्रकरण एक दिवस पेपरला येईल.पुढे आयुक्त, महापौर, उपमहापौर माध्यमांना सांभाळून घेतील.नंतर पुन्हा मुंबईतील डान्सबार मधील वसुली सारखे सुरळीत चालू राहिल.

नागरिकांना प्रश्न पडतो,हे बंद कसे करायचे?त्यावर रामबाण उपाय आहे,जे आता या टिमचे नगरसेवक आहेत यापैकी एकालाही पुन्हा निवडून देऊ नका.नवीन दमाचे नवीन नगरसेवक आले कि,त्यांना या लांचखोरीची ट्रेनिंग असणार नाही.पांच वर्षात ते लांचखोरीत ट्रेन होईपर्यंत पुन्हा त्यांना बदलले पाहिजे.म्हणून तर लोकशाही मधे दर पांच वर्षांनी निवडणूक घेण्याची तरतूद आहे.पण जळगाव मनपात अनेक नगरसेवक नोकरीत कायम असल्यासारखे निवडून येत आहेत.ते निवडून येतात म्हणजे प्रामाणिक आहेत,असे नाही.ते निवडणूक जिंकण्यात पारंगत झालेले आहेत.नगरपालिकेतून कमाई करणे,मतदारांना पैसा वाटणे, पुन्हा नगरपालिका लुटणे.जसे पोलिस कुंटणखान्यावर धाड टाकतात.पकडून खटला दाखल करतात.जामीनवर सुटले कि पुन्हा तोच धंदा .पुन्हा धाड.नंतर जामीन.पुन्हा तोच धंदा असेच जळगाव नगरपालिकेचे आहे.

ही लांचखोरी कोणी आमदार भोळे थांबवणार नाहीत.कोणी पालकमंत्री गुलाबराव थांबवणार नाहीत. मुख्यमंत्री शिंदे थांबवणार नाहीत.अशा अनेक धाडी पडल्या.वाझे आणि देशमुख जेलमधे गेले.तरीही थांबणार नाही.हे आपण मतदार थांबवू शकतो.एकही नगरसेवक पुन्हा नकोच.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Spread the love