आईबाबांनी मतदान केलं नाही तर 2 दिवस उपाशी राहा! बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
47

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मुलांचा राजकारणासाठी वापर करणे हे चुकीचे असून याबद्दल बांगर यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सदर प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत बांगर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोग कारवाई करेल का असा सवाल विचारला आहे.

पालकांनी मत दिले नाही तर विद्यार्थ्यांनी उपाशी राहावे

मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा’ असे म्हटले होते. लाख गावातील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा भयंकर सल्ला दिला होता. ते हा सल्ला देत असताना त्यांच्यासोबतची मंडळी खिदळत असल्याचं व्हिडीओत दिसून आले आहे.

 

Spread the love