पत्नीचे अनैतिक संबंध; पती आणि प्रियकराचे एकमेकांवर चाकूने वार

0
11

जळगाव -पत्नीचे पर पुरूषासोबत संबंध असल्याचे पाहून संतापलेल्या एकाने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केले, यावर त्या व्यक्तीनेही वार केले, तर त्या महिलेने आपल्या पतीला चावा घेतल्याची घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गणेश सखाराम भंडारे (रा. गणपती मंदिराजवळ, कुसुंबा) हा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो सध्या कारागृहात आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे त्याला पॅरोल मिळाल्याने तो गुरूवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या घरी आला. तेथे त्याला पत्नी भारती ही दिसली नाही. यामुळे त्याने तपास केला असता ती नेरी नाक्यावर विनोद अशोक बोरसे (रा. आंबेडकरनगर, जळगाव) याच्या सोबत असल्याची माहिती मिळाल्याने तो तिथे गेले. तेथे विनोदने त्याला मारहाण केली.दरम्यान, विनोद हा रात्री एक वाजेच्या सुमारास विनोदच्या आंबेडकरनगरातील घरी गेला. तेथे त्याने पत्नीला सोबत येण्याचे फर्मावल्यानंतर वाद सुरू झाला. यात विनोदने गणेशवर चाकू हल्ला केला. तर भारतीने त्याच्या पायाला चावा घेतला. तर याच झटापटीत गणेशनेही विनोदवर चाकूने वार केले असून यात तो जखमी झाला आहे.या प्रकरणी गणेश सखाराम भंडारे (रा. गणपती मंदिराजवळ, कुसुंबा) आणि विनोद अशोक बोरसे (रा. आंबेडकरनगर, जळगाव) यांनी शनिपेठ पोलीस स्थानकात एकमेकांच्या विरूध्द फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Spread the love