Jalgaon-आज दि.1 मे, 2022 रोजी, इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘ महाराष्ट्र दिवसानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री. नरेशजी चौधरी , शाळेच्या प्राचार्य परवीन खान मॅडम, समन्वयक श्री. जी. डी. पाटील सर यांच्या उपस्थितीत आणि मराठमोठया वेशभूषेत शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. ‘जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत सादर करून वातावरणात नवचैतन्य आले.












